Abhishek Ghosalkar postmortem report । घोसाळकऱ्यांच्या मृत्यूबाबत पोस्टमार्टमधून धक्कादायक माहिती समोर!

Abhishek Ghosalkar

Abhishek Ghosalkar postmortem report । मुंबईतील दहिसरमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबुक लाईव्ह चालू असताना गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. विशेष म्हणजे घोसाळकर यांना गोळ्या घालणारा आरोपी मॉरीस भाई यानेही स्वत:वर गोळी झाडली. त्याने स्वतःवर चार वेळा गोळी झाडली. त्याचाही मृत्यू झाला आहे. दरम्यान आता घोसाळकर यांचा मृतदेहाचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे.

Pune Crime News । गोळीबाराच्या घटनेने पुणे हादरलं, पैशाच्या वादातून झाडल्या गोळ्या

घोसाळकर यांचा मृत्यू कसा झाला याची धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येत तिसऱ्या व्यक्तीचा समावेश असल्याचा संशय व्यक्त केला जात असतानाच घोसाळकर यांच्या मृतदेहाचा पोस्टमार्टम (Post mortem) रिपोर्ट समोर आला आहे.

Maharashtra politics । राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! निवडणुकांपूर्वी शिंदे गटात केला ५३ नगरसेवकांनी प्रवेश

पोस्टमार्टमच्या अहवालानुसार, हेमरेज आणि अतिरक्तस्त्रावामुळे अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यू झाला आहे. हे शविच्छेदन अहवालात स्पष्ट झालंय. त्याचबरोबर घोसाळकर यांना एकूण ४ गोळ्या लागल्या होत्या. तीन आरपार गेल्या तर एक गोळी शरिरातच मिळाल्याचं अहवालात स्पष्ट झाले आहे. गोळी लागून मृत्यू झाल्याने पोस्टमार्टमची संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्यात आली होती.

Accident news । नवले पुलाजवळ वाहनांचा भीषण अपघात, टँकरने दिलेली चार वाहनांना धडक पाहून पोलिसही चक्रावले

Spread the love