Pune Crime । नशेचं इंजेक्शन दिलं, दारू पाजली.. अन् लॉजमध्ये नेऊन केलं भयानक कृत्य; पुण्यात दोन मुलींवर अत्याचार

Pune Crime News

Pune Crime । मागच्या काही दिवसापासून पुण्यात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. यामुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यात मागच्या काही दिवसापासून अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत ज्यामुळे पुणे हादरून गेले आहे. सध्या देखील पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Baramati Vidhansabha | ब्रेकिंग! अजित पवार यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर

आरोपीने दोन्ही मुलींना नशेचे इंजेक्शन देऊन एका लॉजवर नेले होते, तेथे त्याने त्यांच्यासोबत हा प्रकार केला. याप्रकरणी सध्या पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. पुण्यातील राजगुरुनगरमध्ये ही घटना घडली. आरोपीने आधी दोन्ही अल्पवयीन मुलींना नशेचे इंजेक्शन दिले, त्यानंतर दोघीही बेशुद्ध झाल्या, यानंतर आरोपीने दोन्ही मुलींना एका लॉजमध्ये नेले, जिथे त्यांनी बलात्कार केला.

Pune News । गैरधंद्यांना बसणार आळा, पुणे पोलिसांचे मोठे अश्वासन

पीडितेच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा तिची अवस्था पाहून तिच्या पालकांना धक्काच बसला. यावेळी दोन्ही पीडितांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. संतापलेल्या आणि घाबरलेल्या पालकांनी पोलीस ठाणे गाठले. पीडित महिलांनी आपला संपूर्ण प्रसंग पोलिसांना सांगितला. पिडीतांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी त्यांना नशा करून दारू पाजली, त्यानंतर त्यांना लॉजवर नेले. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे.

Viral Video । धक्कादायक! विमानाच्या दरवाज्यातून व्यक्ती अचानक खाली पडली, कॅमेरात कैद झाला भितीदायक व्हिडिओ

Spread the love