Baramati Vidhansabha | ब्रेकिंग! अजित पवार यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर

Ajit Pawar

Baramati Vidhansabha | यंदा लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) बारामती लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत राहिला आहे. याचं कारण असं की या ठिकाणी पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळाली. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी लढत झाली आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जूनला जाहीर होणार आहे. मात्र सध्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच विधानसभेची जोरदार तयारी सुरू असल्याचे समजत आहे.

Pune News । गैरधंद्यांना बसणार आळा, पुणे पोलिसांचे मोठे अश्वासन

अजित पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशा चर्चा आहेत तर त्यांच्या विरोधात शरदचंद्र पवार गटातून पवार कुटुंबातील व्यक्तीला विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. शरद पवार गटातून युगेंद्र पवार यांना संधी देण्यात येणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे.

Viral Video । धक्कादायक! विमानाच्या दरवाज्यातून व्यक्ती अचानक खाली पडली, कॅमेरात कैद झाला भितीदायक व्हिडिओ

मागच्या काही दिवसापासून युगेंद्र पवार हे सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करताना दिसत आहेत. युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारावेळी युगेंद्र पवार यांनी बारामती तालुक्यामधील अनेक ठिकाणी भेटी दिल्या आहेत त्यामुळे आता बारामती विधानसभा मतदारसंघाचा आश्वासक युवा चेहरा म्हणून योगेंद्र पवार यांच्याकडे पाहिले जाते.

Devendra Fadnavis । देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाबाबत मोठे विधान!

Spread the love