Pune Accident News | पुण्यात भीषण अपघात! कारचालकाने 4 ते 5 दुचाकींना चिरडल…

Pune Accident News

Pune Accident News | पुणे शहरात गुन्हेगारी सोबत अपघाताचे देखील प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आले आहे. यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. सध्या देखील पुण्यातून अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे शहरात भरधाव वेगात असलेल्या कारने 4 ते 5 दुचाकींना जोरदार धडक दिल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दुचाकीस्वार जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

Sharad Mohol | असा ठरला शरद मोहोळच्या हत्येचा कट, वाचा नेमकं काय घडलं?

तेथील उपस्थित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये दुचाकीसह कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. माहितीनुसार कात्रज मांगडेवाडी, सुंदरनगर परिसरात बुधवारी पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.

Makar Sankranti 2024 । पतंगचा माेह जीवावर बेतला! घराच्या छतावरून पडून एकजण जागीच ठार

अपघातानंतर त्या ठिकाणी लोकांची मोठी गर्दी झाली होती. यामुळे मोठी वाहतूक कोंडी देखील झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले यानंतर पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले असून जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल केले. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Deepti Sharma । ICC कडून मोठी घोषणा! टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूला दिला पुरस्कार

कारचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र सध्या कारचालक पोलिसांच्या ताब्यात असून याबाबतचा पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे.

Crime News । सुट्टी ठरली अखेरची! क्रिकेट सामन्यावरून झालेल्या वादात पोलीस हवालदाराचा खून

Spread the love