Crime News । सुट्टी ठरली अखेरची! क्रिकेट सामन्यावरून झालेल्या वादात पोलीस हवालदाराचा खून

Crime News

Crime News । राज्यात गुन्हेगारीविषयी कायदे (Crime law) कडक करूनही गुन्हेगारीला आळा बसला नाही. वाढती गुन्हेगारी (Crime) थांबवणे हे प्रशासनापुढचे एक आव्हान बनले आहे. यातील अनेक घटनांमध्ये निष्पाप नागरिकांचा जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. क्रिकेट क्रिकेट सामन्यावरून झालेल्या वादात पोलीस हवालदाराचा खून करण्यात आला आहे. (Jalgaon Crime News)

Maharashtra Politics । सर्वात मोठी बातमी! महायुतीत ठरला जागा वाटपाचा फॉर्म्युला

ही धक्कादायक घटना जळगावमध्ये घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे प्रतिस्पर्धी क्रिकेट संघातील खेळाडूंमध्ये हा वाद झाला. कॉन्स्टेबल शुभम अगोणे यांच्यावर प्रतिस्पर्धी संघाच्या सदस्यांनी तलवारी आणि क्रिकेट स्टंपने हल्ला चढवला. (Police Constable Killed In Jalgaon) या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Dombivli । एटीएम फोडण्याच्या नादात चोरट्यांचा फसला डाव, 21 लाखांची झाली राखरांगोळी

शुभम अगोणे हे सुट्टीवर आले होते. पण त्यांची हि सुट्टी अखेरची ठरली आहे. ते चाळीसगाव शहारातील रहिवासी होते. त्यांच्या मृत्यूनं गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. तर १२ जणांविरुद्ध खून आणि खुनाचा प्रयत्न यासह विविध गुन्ह्यांसाठी एफआयआर नोंदवला आहे.

Amitabh Bachchan । चाहत्यांच्या चिंतेत वाढ! अमिताभ बच्चन यांच्यावर शस्त्रक्रिया

Spread the love