Sharad Mohol | असा ठरला शरद मोहोळच्या हत्येचा कट, वाचा नेमकं काय घडलं?

Sharad Mohol

Sharad Mohol Murder | पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळच्या (Sharad Mohol) हत्या प्रकरणामुळे पुणे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या हत्येनंतर पोलिसांच्या तपासाला वेग आला होता. दरम्यान आता या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुन्ना पोळेकर (Munna Polekar) हा फक्त मोहरा होता हे समोर आले आहे. कारण या हत्या प्रकरणाचा मास्टर माईंड रामदास मारणे (Ramdas Marane) असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Sharad Mohol Murder in Pune)

Makar Sankranti 2024 । पतंगचा माेह जीवावर बेतला! घराच्या छतावरून पडून एकजण जागीच ठार

पोलिसांनी गुंड विठ्ठल महादेव शेलार आणि रामदास मारणे यांच्यासह १० जणांना ताब्यात घेतले आहे. पनवेल या ठिकाणाहून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आज दुपारी ३ वाजता या सर्व आरोपींना पुणे सत्र न्यायालयात हजर केले होते. या हत्या प्रकरणात आणखी काही गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.

Deepti Sharma । ICC कडून मोठी घोषणा! टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूला दिला पुरस्कार

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शरद मोहोळ हत्या प्रकरणात दोन मुख्य सुत्रधार होते. यात एक विठ्ठल शेलार आणि त्याचा अजून एक साथिदार आहे. यावरून पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती. यावर सुनावणी करत न्यायालयाने शरद मोहोळ हत्या प्रकरणी विठ्ठल शेलार व रामदास उर्फ वाघ्या मारणे या दोघाला २० जानेवारीपर्यत पोलिस कोठडी दिली आहे.

Crime News । सुट्टी ठरली अखेरची! क्रिकेट सामन्यावरून झालेल्या वादात पोलीस हवालदाराचा खून

Spread the love