Prasad Pujari । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. मोस्ट वाँटेड गँगस्टर प्रसाद पुजारी याला चीनमधून मुंबई विमानतळावर हद्दपार करण्यात आले आहे. प्रसाद पुजारी जवळपास 20 वर्षांपासून फरार होता. इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी केली होती. सर्वोच्च गुप्तचर संस्थेने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मुंबईत दहशत पसरवणारा गुंड वर्षानुवर्षे चीनमध्ये होता.
Ajit Pawar । निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना मोठी डोकेदुखी; ‘या’ बड्या नेत्याने वाढवलं टेन्शन
चीनने या गुंडाला भारतात परत पाठवण्याची तयारी दर्शवली होती, त्यानंतर मुंबई पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली. पुजारी मुंबईत पोहोचल्यावर त्याला पकडले जाईल, असे मुंबई गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले होते. चीनमधून फरार गुन्हेगाराच्या प्रत्यार्पणाची ही पहिलीच घटना आहे.
Bjp । निवडणुकीपूर्वी भाजपला सर्वात मोठा धक्का! ‘या’ पक्षाने केली स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा
खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी अशा जवळपास सर्वच मोठ्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असूनही तो नेहमीच फरार असायचा आणि मुंबई पोलिसांसाठी डोकेदुखी बनला होता. मात्र सध्या तो पोलिसांच्या तब्यत आहे. पुजारीवर मुंबईत गोळीबार, खंडणी व खून अशा नऊहून अधिक गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे. त्याला फेब्रुवारी २०२३ मध्ये हाँगकाँगमध्ये चीनी अधिकाऱ्यांनी पकडले होते.
Amol kolhe । शिवाजीराव आढळराव पाटलांचा आज होणार राष्ट्रवादीत प्रवेश? अमोल कोल्हेंचा निशाणा; म्हणाले…