Amol kolhe । शिवाजीराव आढळराव पाटलांचा आज होणार राष्ट्रवादीत प्रवेश? अमोल कोल्हेंचा निशाणा; म्हणाले…

Amol kolhe

Amol kolhe । राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. मागील काही दिवसांपासून महायुतीमध्ये शिरुर लोकसभा जागेवरून तिढा सुरू आहे. अखेर या जागेवरचा तिढा सुटला आहे. यावरून शिरुरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. (Amol kolhe vs Shivaji Adhalrao Patil)

Topers Ad

Eknath Shinde । निवडणुकांच्या तोंडावर एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा धक्का! विजय शिवतारे साथ सोडणार?

शिवाजीराव आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) प्रवेश होणार आहे, असे सांगितले जात आहेत. यावर अमोल कोल्हे म्हणाले की, “शिरुरमध्ये बेडूक उड्या विरुद्ध एकनिष्ठता अशी लढत असून आढळराव पाटलांना चौथ्या पक्ष प्रवेशाच्या मनपूर्वक शुभेच्छा. राजकीय ताकदवान नेत्यांना उमेदवार आयत करावं लागणं हेच माझे यश आहे. केवळ पदासाठी सुरू असणारे तडजोडीचे राजकारण जनता पाहत आहे, समोर काय आहे? कोण आहे? याचे आव्हान करत नाही,” असा टोला अमोल कोल्हे यांनी लावला आहे.

Virat Kohli | मोठी बातमी! पहिल्याच सामन्यात विराट कोहलीचं लज्जास्पद कृत्य; पाहा व्हिडीओ

“अजित दादा मोठे नेते आहेत, इतक्या मोठ्या नेत्यांना आव्हान दिले तर उमेदवार आयत करावे लागत असेल तर सर्वसामान्य जनतेची भावना लक्षात आली असेल. महायुतीमध्ये सगळ काही आलबेल नाही असे विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांच्या भूमिकेनंतर पाहायला मिळत आहे. निलेश लंके यांच्या उमेदवारीवरुन बोलताना एक मोहीम पार पडली, ये तो सिर्फ ट्रेलर है,पिक्चर अभी बाकी है हेच म्हणव लागेल,” असेही अमोल कोल्हे म्हणाले.

Fraud News । राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! देवेंद्र फडणवीसांचा पी. ए. असल्याचे सांगत केली १५ लाखांची फसवणूक

Spread the love