Ajit Pawar । निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना मोठी डोकेदुखी; ‘या’ बड्या नेत्याने वाढवलं टेन्शन

Ajit Pawar

Ajit Pawar । लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. सर्व पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात सभा घेण्यास सुरुवात केली आहे. यंदाची निवडणूक खूप अटीतटीची असणार आहे. जनता आगामी लोकसभा निवडणुकीत कोणाला निवडून देईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. बारामती मतदारसंघाकडे (Baramati Constituency) संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याला कारणही अगदी तसेच आहे. (Latest Marathi News)

Topers Ad

Bjp । निवडणुकीपूर्वी भाजपला सर्वात मोठा धक्का! ‘या’ पक्षाने केली स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा

या मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि शिंदे गटाचे विजय शिवतारे (Vijay Shivatare) निवडणूक लढवणार आहेत. विजय शिवतारे यांनी अजित पवारांचे टेन्शन वाढवले आहे. आज शिवतारे इंदापूर दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना ते असे म्हणाले की, “बारामती मतदारसंघात साडेपाच लाख असे मतदार आहेत ज्यांना सुनेत्रा पवार किंवा सुप्रिया सुळे यांना मतदान करायचं नाही. त्या मतदारांचा प्रतिनिधी म्हणून मी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे,” असे विजय शिवतारे यांनी स्पष्ट केले.

Amol kolhe । शिवाजीराव आढळराव पाटलांचा आज होणार राष्ट्रवादीत प्रवेश? अमोल कोल्हेंचा निशाणा; म्हणाले…

दरम्यान, मागील काही दिवसांपासून महायुतीमध्ये शिरुर लोकसभा जागेवरून तिढा सुरू आहे. अखेर या जागेवरचा तिढा सुटला आहे. शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होणार आहे, असे सांगितले जात आहेत. त्यामुळे आता शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

Eknath Shinde । निवडणुकांच्या तोंडावर एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा धक्का! विजय शिवतारे साथ सोडणार?

Spread the love