Bacchu Kadu । ब्रेकिंग! बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार? महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता

Bacchu Kadu । लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Elections) तारखांची घोषणा झाली असून काही ठिकाणी उमेदवारांच्या नावाची देखील घोषणा झाली आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली नसून तिढा सुटण्यापेक्षा वाढताना दिसतोय. यामधील एक मतदारसंघ म्हणजे अमरावती मतदारसंघ. अमरावती मतदारसंघाचा तिढा सुटण्यापेक्षा आता जास्त वाढताना दिसतोय. प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. बच्चू कडू यांनी खासदार नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे. (Latest Marathi News )

Topers Ad

Prasad Pujari । ब्रेकिंग! 20 वर्षांपासून फरार असलेल्या गुंड प्रसादच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

जर वेळ पडली तर आपण युतीतून बाहेर पडू. प्रहार पक्षाचा उमेदवार अमरावती लोकसभेमध्ये उभा करू.. मात्र कोणत्याच परिस्थितीत नवनीत राणा यांना पाठिंबा देणार नाही. अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे. यामुळे महायुतीत ठिणगी पडली असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेमामुळे आता आम्ही अडचणीत येतोय.. असे देखील बच्चू कडू यांनी म्हटलं आहे

Ajit Pawar । निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना मोठी डोकेदुखी; ‘या’ बड्या नेत्याने वाढवलं टेन्शन

बच्चू कडूंनी जर भूमिका घेतली तर ती भाजप आणि महायुतीसाठी धोक्याची ठरू शकते. कारण बच्चू कडू यांचा अमरावती मतदारसंघात मोठा दरारा आहे. तसेच सर्वसामान्य नागरिक बच्चू कडू यांच्या शब्दाचा मान ठेवतात. त्यामुळे जर बच्चू कडू युतीमधून बाहेर पडले तर त्याचा फटका अमरावती लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीला बसण्याची शक्यता आहे.

Bjp । निवडणुकीपूर्वी भाजपला सर्वात मोठा धक्का! ‘या’ पक्षाने केली स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा

Spread the love