Baramati Loksabha । मोठी बातमी! बारामतीत प्रकाश आंबेडकरांच्या खेळीने पवार कुटुंबाला मोठा धक्का

Baramati Loksabha

Baramati Loksabha । सर्व राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. पण पक्षाने तिकीट नाकारल्याने अनेक नेतेमंडळी पक्षांतर करत आहेत. (Loksabha election) मागील अनेक दिवसांपासून आगामी लोकसभा निवडणूक महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अशातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) मोठी खेळी केली आहे. (Latest marathi news)

Sharad Pawar । “…तर ४ जूनला तुम्हाला समजेल”, शरद पवार यांचे सर्वात मोठे वक्तव्य

बारामती मतदारसंघामध्ये खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Supriya Sule Vs Sunetra Pawar) असा सामना होणार आहे. या सामन्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. वंचित बहुजन आघाडीकडून यापूर्वी 19 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. तर आता आणखी 5 जागांसाठी उमेदवार जाहीर केली आहे. यात पुण्यातून वसंत मोरे, नांदेडमधून अविनाश बोसीकर, परभणीतून बाबासाहेब उगले आणि शिरुर मतदारसंघातून मंगलदास बांदल यांना उमेदवारी दिली आहे.

Vasant More । सर्वात मोठी बातमी! महाविकास आघाडी नाही तर ‘या’ पक्षाकडून वसंत मोरेंना उमेदवारी जाहीर

2019 निवडणुकीत वंचितने बारामतीमध्ये उमेदवार दिला होता. प्रकाश आंबेडकर हे बारामतीमध्ये उमेदवार देणार नसून त्यांनी बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तर नागपूरमध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकरांच्या या निर्णयामुळे अजित पवार गटाला सर्वात मोठा धक्का बसला आहे.

Lok Sabha Election । अहमदनगरच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी; सुजय विखेंसाठी राम शिंदे….

Spread the love