Ahmednagar Politics । …. तर मी उमेदवारी मागे घेणार, निलेश लंकेंना सुजय विखेंनी दिलं खुलं आव्हान

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics । अहमदनगर मतदारसंघात महायुतीने विद्यमान खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके (Nilesh Lanke) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दोन्ही नेत्यांचा मतदारसंघात चांगला दबदबा आहे. त्यामुळे आगामी निवडणूक अटीतटीची होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. अशातच आता निलेश लंकेंना सुजय विखेंनी खुलं आव्हान दिले आहे. (Nilesh Lanke vs Sujay Vikhe Patil)

Baramati Loksabha । मोठी बातमी! बारामतीत प्रकाश आंबेडकरांच्या खेळीने पवार कुटुंबाला मोठा धक्का

अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) कार्यकर्ता मेळाव्यात सुजय विखे बोलत होते. त्यावेळी त्यांनी निलेश लंकेंवर जहरी टीका केली. या मेळाव्याच्या सुरुवातीलाच सुजय विखेंनी संसदेत इंग्रजीत केलेल्या भाषणाचा एक व्हिडीओ दाखवला गेला. याच्या आधारे सुजय विखे यांनी निलेश लंके यांनी महिनाभरात जरी त्यांनी हे इंग्रजीतील भाषण पाठ करून म्हणून दाखवावं, असं थेट आव्हान सुजय विखेंनी दिले आहे. (Latest marathi news)

Sharad Pawar । “…तर ४ जूनला तुम्हाला समजेल”, शरद पवार यांचे सर्वात मोठे वक्तव्य

“मी जेवढी इंग्रजी बोललो आहे तेवढी इंग्रजी निलेश लंके यांनी पाठ करून जरी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही,” असं आव्हान सुजय विखेंनी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे आता निलेश लंके हे सुजय विखेंचं खुलं आव्हान स्वीकारतात की नाही हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Vasant More । सर्वात मोठी बातमी! महाविकास आघाडी नाही तर ‘या’ पक्षाकडून वसंत मोरेंना उमेदवारी जाहीर

Spread the love