Politics News । राजकारणातून मोठी बातमी! निलेश लंकेंबाबत शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Nilesh Lanke

Politics News । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे एकदम धुमधडाक्यात प्रचार सुरू आहे. प्रचारासोबतच अनेक नेते मंडळी आपल्या विरोधकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यामध्येच सर्वात चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे अहमदनगर लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघातून सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक गौप्यस्फोट केला आहे.

Sharad Pawar । पहाटेच्या शपथविधीच्या अजितदादांच्या विधानावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून आमच्या विरोधात आमदार निलेश लंके यांना उमेदवार म्हणून उभे करू नका. आम्हाला दुसरा कोणताही उमेदवार चालेल असा निरोप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका उद्योजकामार्फत आपल्याला पाठवला असल्याचा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Viral । “आधी किस केलं अन् मग…”, दिल्ली मेट्रोत जोडप्याने केले एकदम अश्लील कृत्य; पाहा Video

निलेश लंके यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अहमदनगर शहरात एका सभेला उपस्थित होते. यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. या प्रचार सभेला माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, युवा नेते आदित्य ठाकरे, भूषण सिंह होळकर त्याचबरोबर आमदार रोहित पवार इत्यादी बडे नेते उपस्थित होते.

Salman Khan । धक्कादायक! गँगस्टर लॉरेन्सच्या नावाने बुक केलेली कॅब सलमान खानच्या घरी पोहोचली, पुढे घडलं असं की…

Spread the love