Karnatakas college campus murder । कर्नाटकातील हुबळी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हुबळी-धारवाड महानगरपालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांच्या मुलीची तिच्या महाविद्यालयात भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फैयाज (वय 23 वर्षे) नावाच्या आरोपीने 21 वर्षीय नेहा हिरेमठची हत्या केली.
Sharad Pawar । पहाटेच्या शपथविधीच्या अजितदादांच्या विधानावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…
आरोपी हा बेळगाव जिल्ह्यातील रहिवासी असून, त्याचे हे कृत्य महाविद्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. मात्र त्याला तात्काळ पकडण्यात आले असून या घटनेमागील कारण काय आहे याचा तपास पोलीस करत आहेत. नेहा हिरेमठ हुबळी येथील केएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये एमसीएच्या प्रथम वर्षात शिकत होती. हत्येनंतर नेहाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी केम्पेगौडा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयात नेण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
Viral । “आधी किस केलं अन् मग…”, दिल्ली मेट्रोत जोडप्याने केले एकदम अश्लील कृत्य; पाहा Video
आरोपींची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, फैयाज हा सरकारी शिक्षक असलेल्या पालकांचा मुलगा आहे. प्रथम वर्षाच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे तो गेल्या सहा महिन्यांपासून कॉलेजमध्ये गैरहजर होता. गुरुवारी (18 एप्रिल) तो धारदार शस्त्र घेऊन कॉलेजमध्ये आला आणि नेहा हिरेमठ हिच्यावर वार केले. हत्येनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात फयाजला स्थानिक लोकांच्या मदतीने पकडण्यात आले.