Maratha Reservation । सर्वात मोठी बातमी! मराठा आरक्षणाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल, लवकरच होणार सुनावणी

Maratha Reservation

Maratha Reservation । मराठा आरक्षणच्या मसुद्याला मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली असून राज्य सरकारकडून राज्य मागासवर्गाचा अहवाल मंजूर केल्याची माहिती समोर आली आहे. (Maratha Reservation Protest) या अहवालात मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरवले आहे. समाजाला १० टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे मराठा समाजाला काहीसा दिलासा मिळाला आहे. (Latest marathi news)

Sambhaji Bhide । संभाजी भिडेंची अडवली कार, प्रचंड घोषणाबाजी देत दाखवले काळे झेंडे, नेमकं कारण काय?

पण सरकारनं दिलेल्या 10 टक्के मराठा आरक्षणाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे. याप्रकरणी डॉ. जयश्री पाटील आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली असून या आरक्षणाबरोबरच न्या. शुक्रेंच्या नियुक्तीवरही आक्षेप घेतला आहे. यावर पुढच्या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Sanjay Gaikwad । धक्कादायक! शिंदे गटाच्या आमदाराने पोलिसांसमोरच केली युवकांना मारहाण, वादग्रस्त व्हिडिओ व्हायलर

राज्य सरकारनं वकिलांच्या रोस्टर पद्धतीत २७ फेब्रुवारीला जो बदल केला होता त्यावर आक्षेप घेतला आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची नियुक्ती बेकायदा आहे. निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांना सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधिशांपेक्षा जास्त मानधन दिल्याचा आरोप सदावर्तेंनी याचिकेतून केला आहे.

Car Accident । मोठी दुर्घटना! केंद्रीय मंत्र्यांच्या कारचा भीषण अपघात

Spread the love