
Sanjay Gaikwad । बुलढाणा : शिवसेना शिंदे गटाचे आमदार (MLA of Shiv Sena Shinde group) सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत येत असतात. यामुळे त्यांना विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागतो. अशातच आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड चर्चेचा विषय बनत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी त्यांनी वाघाची शिकार केल्याच्या दाव्यामुळे चांगलाच गदारोळ उडाला होता. (Latest marathi news)
Car Accident । मोठी दुर्घटना! केंद्रीय मंत्र्यांच्या कारचा भीषण अपघात
अशातच आता त्यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ चांगलाच व्हायलर (Sanjay Gaikwad Viral Video) होत आहे. यामुळे त्यांच्या अडचणी वाढू शकतात. दरम्यान, हा व्हिडिओ शिवजयंती मिरवणुकीतील आहे. या मिरवणुकीत संजय गायकवाड हे काही युवकांना बॉडीगार्डची काठी घेऊन सपासप मारहाण करत आहे. त्यामुळे घटनास्थळी प्रचंड गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे गायकवाड युवकांना मारहाण करत असताना पोलीस कर्मचारी देखील त्या ठिकाणी उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहेत. विशेष बाब म्हणजे बुलढाणा शहरातील या घटनेवर पोलिसांकडून काहीच पावले उचलली गेली नाही. या प्रकरणावरूनही आता शिंदे सरकारला आणि संजय गायकवाड यांना विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागेल.