Patanjali Products । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर उत्तराखंड सरकारच्या परवाना प्राधिकरणाने बाबा रामदेव यांच्या दिव्या फार्मसी आणि पतंजली आयुर्वेदावर मोठी कारवाई केली आहे. राज्य सरकारच्या परवाना प्राधिकरणाने पतंजली आयुर्वेद आणि दिव्या फार्मसीच्या 14 औषधे आणि उत्पादनांच्या उत्पादन परवान्यावर बंदी घातली आहे. यासोबतच संबंधित विभागांना कठोर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यामुळे रामदेव बाबा यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
Asaduddin Owaisi । “मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात”, ओवैसींचा मोदींवर ‘त्या’ वक्तव्यावरून निशाणा
औषध (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा आणि सौंदर्य प्रसाधने कायद्याचे उल्लंघन करून या उत्पादनांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबाबत कंपनीच्या तक्रारींची दखल घेऊन हा आदेश जारी करण्यात आला आहे. (Patanjali Products Ban)
Rohit Pawar । राजकीय वर्तुळात खळबळ! रोहित पवारांनी फडणवीसांवर केला धक्कादायक आरोप
या उत्पादनांचा परवाना निलंबित
आदेशानुसार, दिव्या फार्मसीच्या उत्पादनांमध्ये ज्यांचे उत्पादन परवाने निलंबित करण्यात आले आहेत त्यामध्ये श्वासरी गोल्ड, श्वासरी वटी, ब्रॉन्कॉम, श्वासरी प्रवाही, श्वासरी अवलेहा, मुक्ता वती एक्स्ट्रा पॉवर, लिपिडॉम, बीपी ग्रिट, मधुग्रिट, पतंजली दृष्टी आय ड्रॉप, आयजी यांचा समावेश आहे.
वारंवार नियमांचे उल्लंघन केल्याने परवाना रद्द करण्यात आल्याचे या आदेशात म्हटले आहे. यापूर्वी 10 एप्रिल रोजी राज्य सरकारने कंपनीला नोटीस बजावून उत्तर मागितले होते. परवाना प्राधिकरणाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रही दाखल केले आहे.