Parth Pawar । पार्थ पवार यांच्याकडे खडकवासला विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी

Parth Pawar । बारामती मतदारसंघात महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहेत. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचारासाठी अजित पवारांनी चांगलीच कंबर कसली आहे. याच मतदारसंघात महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अशातच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे.

Rajasthan Accident । भीषण अपघात, लग्नातील पाहुण्यांनी भरलेली मिनी बस अनियंत्रित ट्रॉलीला धडकली, 9 जणांचा मृत्यू

अजित पवारांकडून पार्थ पवार यांच्याकडे खडकवासला विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे पार्थ पवार हे मागील काही दिवसांपासून या भागात सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहेत . पार्थ पवार हे नेर्हे, कर्वेनगर, धायरी, वारजे, नांदेड सिटी, कोथरूड,कोंढवे -धावडे, उत्तम नगर, सिंहगड रस्त्याचा काही भाग, वडगाव या भागात फिरत आहेत.

Sharad Pawar । बिग ब्रेकिंग! उमेदवारीवरुन धुसफूस थांबवण्यासाठी शरद पवार रिंगणात, पदाधिकाऱ्यांसह बंद दाराआड चर्चा सुरु

पार्थ पवार यांच्यावर या भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि भाजपच्या (BJP) माजी नगरसेवकांना सोबत घेऊन प्रचाराची जबाबदारी दिली आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि शिवसेनेचा दबदबा आहे. २०१४ मध्ये भाजपसोबत महायुतीतून लढलेल्या महादेव जानकर यांना चांगले मताधिक्य मिळाले होते. २०१९ मध्येही भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना या मतदारसंघातून लीड मिळाले होते.

Prakash Ambedkar । राजकारणातून मोठी बातमी! प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का

पण या मतदारसंघात हे उमेदवार पोहोचले नव्हते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मतदान झाल्याचे बोलले जात आहे. पण यंदा या मतदारसंघात नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नावावरती मतदान मिळणे कठीण झाले आहे. अशा वेळी राष्ट्रवादीचा उमेदवार आणि पक्षाचे चिन्ह हे मतदारांपर्यंत पोहोचवणे राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्त्वाचे आहे.

Ajit Pawar । अजितदादांचा दिलदारपणा! अपघातग्रस्ताला पाहताच गाडी थांबवली आणि…

Spread the love