Car Accident । सर्व पक्ष निवडणुकीच्या तोंडावर जय्यत तयारी करताना दिसत आहे. येत्या काही दिवसात पार पडणाऱ्या निवडणुकीत कोणाचा विजय होणार? याकडे सर्वांचे लक्ष असेल. राजकीय नेत्यांचे दौरे वाढले आहेत. अशातच आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपच्या (BJP) माजी मंत्र्यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. (Latest Marathi News)
Maratha reservation । धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी आणखी एकाचा बळी, शर्टने पळसाच्या झाडाला…
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री भाजप नेते डॉ. परिणय फुके (Parinay Phuke) यांच्या वाहनाचा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे.(Parinay Phuke Accident) सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातात परिणय फुके थोडक्यात बचावले आहेत. पण या अपघातात कारचा पूर्णता चक्काचूर झाला आहे.
राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना हा भीषण अपघात झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा अपघात होता की घातपात याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. मागील काही दिवसांपूर्वीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचादेखील कारचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात ते थोडक्यात बचावलेत.