Baramati Loksabha Election । मोठी बातमी! बारामतीत रिक्षावाला संघटनेकडून शरद पवार निवडणूक मैदानात, पण हे पवार…

Baramati Loksabha Election

Baramati Loksabha Election । बारामती मतदारसंघात (Loksabha Election) यंदा अटीतटीची लढत पार पडणार आहे. कारण पहिल्यांदाच या मतदासंघात नणंद विरुद्ध भावजय असा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार (Supriya Sule Vs Sunetra Pawar) यांच्या लढतीत कोणाचा विजय होणार? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अशातच आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. (Latest marathi news)

Politics news । राजकीय वर्तुळात खळबळ! बड्या नेत्याला दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून जीवे मारण्याची धमकी

बारामती लोकसभा मतदार संघात आता आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शरद पवार असे या उमेदवाराचे नाव आहे. पण हे शरद पवार म्हणजे ज्येष्ठ नेते शरद गोविंदराव पवार (Sharad Pawar) नाहीत. हे शरद राम पवार (Sharad Ram Pawar) आहेत. त्यांनी रिक्षावाला संघटनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या केवळ नावात साधर्म्य असल्यामुळे चर्चा रंगली आहे.

Sharad Pawar । शरद पवारांचा भाजपाला पुन्हा धक्का! बडा नेता घेणार भेट

शरद राम पवार हे स्वतः रिक्षाचालक असून गेल्या अनेक वर्षापासून पुण्यातील आंबेगाव बुद्रुकमध्ये राहतात. ते देखील निवडणूक रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले लक्ष्मण खाबिया यांनी सुनंदा पवार यांच्यासाठी उमेदवारी अर्ज घेतला आहे.

Crime News । छत्रपती संभाजीनगर हादरलं! जन्मदात्यांच्या जीवावर उठला कर्जबाजारी मुलगा, अगोदर वडिलांना संपवलं आणि…

Spread the love