Politics news । राजकीय वर्तुळात खळबळ! बड्या नेत्याला दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून जीवे मारण्याची धमकी

Politics news

Politics news । राज्यात सध्या निवडणुकांची (Loksabha) लगबग सुरु आहे. सर्व पक्ष जोमाने तयारी करताना दिसत आहे. अवघ्या काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका सुरु होतील. राज्यात यंदा कोणाचे सरकार येणार? याबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. अशातच आता राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. (Latest marathi news)

Sharad Pawar । शरद पवारांचा भाजपाला पुन्हा धक्का! बडा नेता घेणार भेट

शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांना चार वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर तक्रार दाखल केली असून कुख्यात गुंड आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आणि छोटा शकील गँगकडून (Chota Shakeel Gang) धमकी दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Crime News । छत्रपती संभाजीनगर हादरलं! जन्मदात्यांच्या जीवावर उठला कर्जबाजारी मुलगा, अगोदर वडिलांना संपवलं आणि…

विशेष म्हणजे यापूर्वीही दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून एकनाथ खडसे यांना धमकी देण्यात आली होती. हे फोन अमेरिका आणि उत्तर प्रदेशातून लखनऊमधून आल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. चार ते पाच वेळा असे फोन आल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

Kailas Patil । मोठी बातमी! ठाकरे गटाच्या आमदाराला प्रचारसभेत आली भोवळ

Spread the love