Pankaja Munde । सर्वात मोठी बातमी! पंकजा मुंडे यांना दुखापत, रद्द केले आठवड्याभराचे कार्यक्रम

Pankaja Munde

Pankaja Munde । अवघ्या काही महिन्यांवर लोकसभेच्या निवडणुका (Loksabha election 2024) येऊन ठेपल्या आहेत. यामुळे सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. पक्षफुटीमुळे यंदाची निवडणूक अटीतटीची असणार आहे. अशातच आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांचे आठवड्याभराचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. (Latest marathi news)

Crime News । धक्कादायक! स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू होते नको ते धंदे, पोलिसांनी केली १३ तरुणींची सुटका

याबाबत स्वतः पंकजा मुंडे यांनीच ट्वीट करत माहिती दिली आहे. ”माझ्या खांद्याला दुखापत झाली असल्याने मला हा आठवडा उपचार घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे मी माझे सर्व कार्यक्रम पुढे ढकलत आहे. प्रवास करण्याची परवानगी नाही.” अशा आशयाचे ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे. दरम्यान, मागील दोन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे या बीडच्या माजलगाव येथे एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या होत्या.

Anil Babar Passed Away । दुःखद! शिंदे गटाचे पाणीदार आमदार अनिल बाबर यांचं आकस्मिक निधन

पंकजा मुंडे या पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय झालेल्या दिसत आहेत. सध्या राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष राज्यात सुरु आहे. तरीही त्यांनी कोणत्याही ओबीसी मेळाव्यात किंवा बैठकीसाठी हजेरी लावलेली नाही. याउलट त्यांची विधानं ही मराठ्यांच्या बाजूने येत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचीही भेट घेतली होती.

Manvendra Singh Accident । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! काँग्रेसच्या माजी खासदाराच्या कारला भीषण अपघात

Spread the love