Crime News । धक्कादायक! स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू होते नको ते धंदे, पोलिसांनी केली १३ तरुणींची सुटका

Crime News

Crime News । छत्रपती संभाजीनगर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे (Crime) प्रमाण वाढत चालले आहे. वाढत्या गुन्हेगारीला रोखणे हे पोलिसांसमोरचे मोठे आव्हान बनले आहे. सरकारने वेश्या व्यवसायाला बंदी घातली आहे, पण तरीही राज्यात सर्रास वेश्या व्यवसाय सुरु आहे. नुकतीच पोलिसांनी याप्रकरणी १३ तरुणींची सुटका केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे स्पा सेंटरच्या (Spa center) नावाखाली हा सर्व प्रकार सुरु होता. (Latest marathi news)

Anil Babar Passed Away । दुःखद! शिंदे गटाचे पाणीदार आमदार अनिल बाबर यांचं आकस्मिक निधन

हा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar Crime) शहरातील एन-3 परिसरात असणाऱ्या दोन स्पा सेंटरवर घडला आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली हायप्रोफाइल वेश्या व्यवसाय सुरू आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार, पोलिसांनी सापळा लावला. पोलिसांनी काही डमी ग्राहक पाठवून गैरप्रकाराची खात्री करून घेतली.

Manvendra Singh Accident । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! काँग्रेसच्या माजी खासदाराच्या कारला भीषण अपघात

खात्री पटताच पोलिसांनी धाड टाकली. यावेळी पोलिसांना स्थानिक तरुणांसह काही तरुणी नको त्या अवस्थेत आढळून आल्या. या तरुणांसह १३ तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तसेच त्यांच्याकडे असणारे रोकड, देहविक्रीसाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. पोलिसांनी महिला मॅनेजरसह अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Mexico Accident । भीषण रस्ता अपघात, प्रवाशांनी भरलेली बस उलटली, 18 जागीच ठार तर 29 जखमी

Spread the love