Ajit Pawar । राज्यसभा निवडणुकीनंतर होणार मोठा भूकंप? अजित पवार गटाने आमदारांना दिल्या ‘या’ सूचना

Ajit Pawar

Ajit Pawar । मुंबई : राज्यात लवकरच निवडणुका (Election 2024) पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक (Rajyasabha election) जाहीर केली आहे. १५ राज्यातील २७ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार आहे. यात महाराष्ट्रातील ६ जागांचा समावेश आहे. अशातच आता अजित पवार गटाकडून (Ajit Pawar group) आमदार, मंत्र्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. (Latest marathi news)

Pankaja Munde । सर्वात मोठी बातमी! पंकजा मुंडे यांना दुखापत, रद्द केले आठवड्याभराचे कार्यक्रम

या निवडणुकीमध्ये अजित पवार गट काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कोणत्याही फॉर्मवर सह्या न करण्याच्या सूचना त्यांनी नेत्यांना दिल्या आहेत. नुकतीच ही बैठक संपन्न झाली. दरम्यान, 13 राज्यातील 50 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपणार असून दोन राज्यांतील उरलेल्या सहा सदस्य 3 एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत.

Crime News । धक्कादायक! स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू होते नको ते धंदे, पोलिसांनी केली १३ तरुणींची सुटका

२७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, ओडिशा, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये राज्यसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाच लक्ष असणार आहे.

Anil Babar Passed Away । दुःखद! शिंदे गटाचे पाणीदार आमदार अनिल बाबर यांचं आकस्मिक निधन

Spread the love