Nrendr Modi । NDA संसदीय पक्षाचे नेते नरेंद्र मोदी रविवारी संध्याकाळी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी मोदींना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले. मुर्मू यांनी मोदींना पंतप्रधानपदासाठी उमेदवारी दिली. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने २९३ जागा जिंकल्या आहेत. तर भाजपने 240 जागा जिंकल्या आहेत. बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ, मॉरिशस आणि सेशेल्सचे प्रमुख नेते पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाच्या पाच कंपन्या, नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) कमांडो, ड्रोन आणि ‘स्नायपर्स’ तैनात करण्यात आले आहेत. परदेशी पाहुणे राजधानीतील लीला, ताज, आयटीसी मौर्य, क्लेरिजेस आणि ओबेरॉय हॉटेल्समध्ये राहतील. त्यामुळे हॉटेलांना सुरक्षा कवचाखाली घेण्यात आले आहे.
पोलीस आणि एनएसजी कमांडो तैनात असतील
सोहळ्याच्या दिवशी राष्ट्रपती भवन आणि विविध महत्त्वाच्या ठिकाणी दिल्ली पोलिसांचे SWAT आणि NSG कमांडो तैनात असतील. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी समारंभाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा योजना तयार करण्यासाठी पोलिस मुख्यालय आणि नवी दिल्ली जिल्ह्यात अनेक बैठका घेतल्या. राष्ट्रपती भवनात शपथविधी होणार असल्याने संकुलाच्या आत आणि बाहेर त्रिस्तरीय सुरक्षा असेल.
Lok Sabha Chunav 2024 । साताऱ्यातील पराभवावर शरद पवार गटाचा सर्वात मोठा दावा