Supriya Sule । सुप्रिया सुळेंचे अजित पवारांना खुले आव्हान; म्हणाल्या…

Supriya Sule And Ajit Pawar

Supriya Sule । लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) अनेक लढती महत्त्वाच्या ठरल्या आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष बारामती लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागले होते, कारण येथून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार एकमेकांसमोर उभ्या होत्या. अखेर सुप्रिया सुळे यांनी ही निवडणूक मोठ्या फरकाने जिंकून सुनेत्रा पवार यांचा पराभव केला.

Ajit Pawar On Devendra Fadnavis । देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या प्रस्तावावर अजित पवारांचा मोठा खुलासा; म्हणाले…

ही लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना खुले आव्हान दिले आहे. अजित पवारांचे वर्चस्व असलेल्या इंदापूर तालुक्यातील भवानी नगर येथील छत्रपती साखर कारखान्यातून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. संघर्ष करून, जिंकून कारखाना पुन्हा रुळावर आणण्याचा निर्धार त्यांनी कामगारांसमोर व्यक्त केला.

Nrendr Modi । मोठी बातमी! नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदावरून अजित पवार यांची राजकीय आणि सामाजिक कारकीर्द ज्या मूळ जागेवरून सुरू झाली, तिथूनच निवडून येण्याचा निर्धार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक काही दिवसांत होत आहे. अशा स्थितीत सुप्रिया सुळे यांचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे ठरते.

Havaman Andaj। मोठी बातमी! राज्यासह देशभरात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

Spread the love