Ajit Pawar On Devendra Fadnavis । महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत भाजपच्या खराब कामगिरीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (7 जून) सांगितले की, राज्यातील भाजपच्या खराब कामगिरीमुळे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या प्रस्तावावर एनडीएच्या बैठकीत चर्चा झाली नाही.
Lok Sabha Chunav 2024 । साताऱ्यातील पराभवावर शरद पवार गटाचा सर्वात मोठा दावा
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्याची ऑफर ही भाजपची अंतर्गत बाब असून दिल्लीतील एनडीएच्या बैठकीत त्यावर चर्चा केली जाईल. असं ते म्हणाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर विजय मिळवला आहे.
Ajit Pawar । राजकारणातून मोठी बातमी! अजित पवार गटाचे नेते शरद पवारांच्या संपर्कात?
महायुतीला महाराष्ट्रात किती जागा मिळाल्या?
महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा मागील सार्वत्रिक निवडणुकीतील २३ वरून २०२४ च्या निवडणुकीत ९ वर आल्या आहेत. आरएसएसच्या प्रमुख नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी भेट घेऊन निवडणुकीनंतरच्या परिस्थितीवर चर्चा केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेने 7 जागा जिंकल्या आहेत. त्याचबरोब्र अजित पवार गटाने १ जाग जिंकली आहे.