Ajit pawar । अजित पवार गटाच्या समर्थकांसाठी महत्त्वाची बातमी! मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळणार का नाही? मोठी बातमी समोर

Ajit Pawar

Ajit pawar । नव्या एनडीए सरकारमध्ये कोणत्या पक्षाला कोणते मंत्रिपद मिळाले, या चर्चेला वेग आला आहे. एनडीए सरकारचा 9 जून रोजी शपथविधी होणार आहे. त्याआधी मंत्रिमंडळात कोण असणार हे ठरवण्याची कसरत जोरात सुरू झाली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसही एनडीएचा एक भाग आहे. दिल्लीत एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीला अजित पवारही उपस्थित होते.

Lok Sabha Chunav 2024 । साताऱ्यातील पराभवावर शरद पवार गटाचा सर्वात मोठा दावा

अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली आहेत. सूत्रांवर विश्वास ठेवला तर अजित पवार यांच्या पक्षातील एका नेत्याचा मोदी मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो. मात्र, अजित पवार यांच्या पक्षाने मंत्रिमंडळात एकापेक्षा जास्त जागा मागितल्याचेही सूत्रांनी सांगितले.

Ajit Pawar । राजकारणातून मोठी बातमी! अजित पवार गटाचे नेते शरद पवारांच्या संपर्कात?

लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाला महाराष्ट्रात केवळ एक जागा मिळाली. प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यामुळे आता याबाबत पुढील निर्णय काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ajit Pawar । राजकारणातून मोठी बातमी! अजित पवार गटाचे नेते शरद पवारांच्या संपर्कात?

Spread the love