Accident News । भयानक दुर्घटना! लिफ्ट कोसळून ४ जणांचा जागीच मृत्यू तर ५जण गंभीर जखमी

Accident News । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नोएडा मध्येग्रेटरच्या बिसरख कोतवाली परिसरात इमारतीमध्ये लिफ्ट कोसळून अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोतवाली परिसरामध्ये आम्रपाली ग्रुपच्या एका इमारतीचे काम सुरू होते यावेळी हा अपघात झाला आहे.

Manoj Jaranage Patil । उपोषण सोडले तरीही मनोज जरांगे पाटील आंदोलनस्थळी, जाणून घ्या यामागचं मोठं कारण

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर त्यांनी लगेचच बचाव कार्यास सुरुवात केली. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दुर्घटना घडली त्यावेळी लिफ्टमध्ये बांधकामासाठीचे साहित्य आणि कामगार होते. या घटनेमध्ये चार कामगारांचा मृत्यू झाला आहे तर पाच कामगार जखमी झाले आहेत.

Sairaj Kendre । साईराजने गाजवलं पण ‘या’ दोन चिमुकल्यांनी गायलं ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला गाणं’; पाहा video

सध्या मृत्यू झालेल्या कामगारांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. सर्व मृत कामगार हे बिहारच्या किशनपुर गावचे रहिवासी असल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे तेथील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आता या घटनेचा पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे.

Asia Cup 2023 । आशिया स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानला ICC चा आणखी एक मोठा धक्का

Spread the love