Dombivli News । धक्कादायक बातमी! डोंबिवलीमध्ये कोसळली तीन मजली इमारत, नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Dombivli Building Collapse

Dombivli News । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. डोंबिवलीत तीन मजली इमारत कोसळली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबवली पूर्वेतील आयरे-दत्तनगर परिसरामध्ये आदिनारायण नावाची इमारत कोसळली आहे. विशेष म्हणजे या इमारतीमधील राहणाऱ्या लोकांना गुरुवारीच (ता. १४) दुसरीकडे स्थलांतरित होण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर लगेचच इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Dombivli News)

Accident News । भयानक दुर्घटना! लिफ्ट कोसळून ४ जणांचा जागीच मृत्यू तर ५जण गंभीर जखमी

नोटीस पाठवल्यानंतर काही कुटुंबाने स्थलांतर केले मात्र काही कुटुंब अजूनही या इमारतीमध्ये राहत होते त्यामुळे ही इमारत कोसळल्यानंतर आता अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळतात तातडीने अग्निशमन दलाचे जवान, महापालिका प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव कार्यास सुरुवात केली.

Manoj Jaranage Patil । उपोषण सोडले तरीही मनोज जरांगे पाटील आंदोलनस्थळी, जाणून घ्या यामागचं मोठं कारण

प्रशासनाकडून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. बचाव पथक ढिगारा बाजूला काढण्याचे काम करत आहे. त्याचबरोबर नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढता यावे यासाठी बचाव पथकाकडून रेस्क्यू ऑपरेशन देखील सुरू आहे.

याबाबत माहिती देताना कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे म्हणाले की, ही इमारत खचत असल्याच आम्हाला समजल्यावर आम्ही त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना बाहेर काढलं मात्र तरी दोन जण अडकल्याची माहिती समोर आली आहे. असे ते म्हणाले आहेत.

Sairaj Kendre । साईराजने गाजवलं पण ‘या’ दोन चिमुकल्यांनी गायलं ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला गाणं’; पाहा video

Spread the love