Manoj Jaranage Patil । उपोषण सोडले तरीही मनोज जरांगे पाटील आंदोलनस्थळी, जाणून घ्या यामागचं मोठं कारण

Manoj Jaranage Patil । मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमध्ये उपोषण (Manoj Jaranage Patil Protest) सुरु केले होते. सुरुवातील त्यांच्या उपोषणकडे सरकारचे लक्ष वेधले नाही. परंतु लाठी हल्ला झाल्यानंतर सरकारसह संपूर्ण राज्याचे त्यांच्याकडे लक्ष वेधले गेले. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आश्वासनानंतर 17 दिवसांनी जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. (Latest Marathi News)

Sairaj Kendre । साईराजने गाजवलं पण ‘या’ दोन चिमुकल्यांनी गायलं ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला गाणं’; पाहा video

परंतु उपोषण मागे घेऊनही ते आंदोलनस्थळीच आहेत. “जोपर्यंत मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार आहे. (Maratha Reservation Protest) आमरण उपोषण सोडल असले तरी साखळी उपोषण सुरु राहील. सरकारला एक महिन्याचा वेळ दिला आहे. प्रमाणपण देण्याची जबाबदारी सरकारची आहे,” असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Asia Cup 2023 । आशिया स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानला ICC चा आणखी एक मोठा धक्का

‘आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही’

“मनोज जरांगे पाटील तुम्ही आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नसाल, तर मी सुद्धा आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. जीआर काढला, तर तो कोर्टात टिकणार नाही. आम्हाला टिकणार आरक्षण द्यायच आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. त्यामुळे आता मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र मिळणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Arjun Kapoor । अर्जुन कपूरवर कोसळला दुःखाचा डोंगर! कुटुंबातील जवळच्या सदस्याने घेतला अखेरचा श्वास

Spread the love