Nitin Gadkari । यवतमाळ: देशभरात सध्या निवडणुकीची (Loksabha election) रणधुमाळी सुरु आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीने आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. सत्तेत येण्यासाठी ठिकठिकाणी राजकीय नेतेमंडळी प्रचारसभा घेताना दिसत आहेत. राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढत चालला आहे. वाढत्या उन्हाचा फटका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना बसला आहे. (Loksabha election 2024)
देशभरात बहुतांश भागात पारा ४० अंश सेल्सिअस वर गेला आहे. पण निवडणुका जवळ आल्या असल्याने या कडक उन्हातच राजकीय पक्षांच्या प्रचार सभा सुरु आहेत. अशाच एका भाजपच्या प्रचारसभेत नितीन गडकरी यांना भोवळ आल्याची घटना घडली आहे. यावेळी मंचावर उपस्थित असणारे नेते, कार्यकर्ते त्यांच्या मदतीला धावले.
ही घटना यवतमाळच्या पुसदमध्ये घडली आहे. दरम्यान, महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील (Rajshree Patil) यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज नितीन गडकरी यांची जाहीर सभा पुसद येथे आयोजित केली होती. याच आयोजित कार्यक्रमावेळी नितीन गडकरी भाषणासाठी आले. पण ते भाषण देत असताना अचानक त्यांना भोवळ आली. त्यानंतर त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले.
Ajit Pawar । “बायकोचं काम करावेच लागणार, नाहीतर …..”; अजित पवार यांनी प्रचारात सांगितला ‘तो’ किस्सा