Congress ।
सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसने पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी बंडखोरी करत कोल्हापूर लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या बंडखोरीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनंतर उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी ही कारवाई केली आहे. छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. सचिव बाजीराव खाडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.