Uddhav Thackeray । पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून उद्धव ठाकरेंची जहरी टीका, म्हणाले; “घरात काम करणाऱ्यांनाही….”

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray । नांदेड : महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. महाविकास आघाडीचे सर्व राजकीय नेते जोरदार प्रचार आहेत. आगामी काळात महाविकास आघाडी की महायुतीचे सरकार येणार? हे येत्या काळात स्पष्ट होईल. प्रचार सभेदरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे (Ajit Pawar) पुत्र पार्थ पवारांवर (Parth Pawar) निशाणा साधला आहे.

Ajit Pawar । “बायकोचं काम करावेच लागणार, नाहीतर …..”; अजित पवार यांनी प्रचारात सांगितला ‘तो’ किस्सा

“घरात काम करणाऱ्यांनाही झेड सुरक्षा दिली जाते. सलमान खानच्या (Salman Khan) घरासमोर गोळीबार होतो. गद्दारांना सुरक्षा आहे पण सर्वसामान्य लोकांना सुरक्षा नाही. शिवसेनेच्या 7/12 वर गद्दारांनी नाव लिहिलं. उद्या आमच्या नावावर देखील नाव लिहण्यात येतील. अनेकजण काँग्रेसमध्ये येत आहेत, सुभेदारी मोडून पडली, लोक मोठी झाली की गद्दार होतात पण जनता गद्दार होत नाही,” असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Sharad Pawar । राजकरणात मोठी खळबळ! भरसभेत शरद पवारांनी ऐकवली मोदींच्या भाषणाची ‘ती’ ऑडिओ क्लिप

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, “राज्यात जर महाविकास आघाडीचं सरकार असताना गद्दारी झाली नसती तर या सरकारने खूप कामे केली असती. आता आम्ही सर्व मिळून पहिल्यांदा निवडणुक लढवत आहोत आणि सर्व मित्र पक्षाचे कार्यकर्ते एकजुटीने काम करत आहे. आगामी निवडणुकीत आमचे सर्व खासदार निवडून येतील,” असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Baramati Loksabha । बारामतीत हाय व्होल्टेज लढत वेगळ्या वळणावर? दोन्ही पवार एकाच गाडीवर

Spread the love