Nashik Lok Sabha । ब्रेकिंग! निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना जबर धक्का; बड्या नेत्याने ऐनवेळी सोडली साथ

Uddhav Thackeray

Nashik Lok Sabha । ऐन निवडणूक काळात (Loksabha election) राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. अशातच निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) खूप मोठा धक्का बसला आहे. (Latest marathi news) नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे.

Crime News । भयानक! बापानेच केला दोन चुमुकल्या मुलांचा अंत? हृदय पिळवटून टाकणारी घटना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. ५) रात्री मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडला. यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे. विजय करंजकर हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते. मात्र, ठाकरेंनी राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली त्यामुळे नाराज झालेल्या करंजकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

Sharad Pawar News । बिग ब्रेकिंग! शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ असल्याने उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

करंजकर यांनी मुंबई या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर करंजकर यांच्यावर उपनेते आणि नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Ajit Pawar । भाषणावेळी रोहित पवार रडले, अजित पवारांनी भरसभेत केली नक्कल

Spread the love