Lok Sabha Election 2024 । ब्रेकिंग! काँग्रेस कार्यालयाबाहेर तोडफोड, १० ते १२ वाहनांची तोडफोड; भाजपवर गंभीर आरोप

Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024 । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. रविवारी रात्री उशिरा अज्ञात लोकांनी उत्तर प्रदेशातील अमेठी येथील गौरीगंज येथील काँग्रेस कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून याविरोधात रस्त्यावर उतरलेल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. या हल्ल्याबाबत काँग्रेस पक्षाने निवेदन जारी केले आहे.

Nashik Lok Sabha । ब्रेकिंग! निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना जबर धक्का; बड्या नेत्याने ऐनवेळी सोडली साथ

काँग्रेसने म्हटले आहे की, ‘स्मृती इराणी आणि भाजपचे कार्यकर्ते यूपीच्या अमेठीमध्ये चांगलेच घाबरले आहेत. समोरच्या पराभवाने हताश झालेले भाजपचे गुंड लाठ्या घेऊन अमेठीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर पोहोचले आणि तेथे उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. अमेठीतील काँग्रेस कार्यकर्त्यांवर आणि जनतेवरही प्राणघातक हल्ला झाला आहे. या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

Crime News । भयानक! बापानेच केला दोन चुमुकल्या मुलांचा अंत? हृदय पिळवटून टाकणारी घटना

काँग्रेसने आरोप केला की, ‘घटनेदरम्यान स्थानिक लोकांच्या वाहनांचेही नुकसान झाले. अमेठीमध्ये भाजपचा पराभव होणार आहे याची ही घटना साक्षीदार असल्याचे बोलले जात आहे. अलीकडेच काँग्रेसने किशोरीलाल शर्मा यांना अमेठीतून उमेदवारी दिली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी भाजपकडून निवडणूक रिंगणात आहेत.

Sharad Pawar News । बिग ब्रेकिंग! शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ असल्याने उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Spread the love