Mumbai News । मुंबईत इनोवा कारमध्ये सापडले कोट्यवधी रुपये, राजकीय वर्तुळात खळबळ

Mumbai News

Mumbai News । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मतदानाच्या अगोदरच राज्यभर कॅश कांडच्या विविध घटनांनी मोठा गदारोळ उडवला आहे. एक असेच प्रकरण मुंबईतील गोरेगाव पूर्व, दिंडोशी विधानसभा मतदारसंघात समोर आले आहे. इथे एका इनोवा कारमधून कोट्यवधी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आले आहे. या कारवर शिंदे गटाच्या एकनाथ शिंदे यांच्या स्टीकरची छाप होती. पोलिसांनी कार ताब्यात घेतली असून त्यामध्ये सापडलेली रक्कम कोणाची आहे, याचा तपास सुरू आहे.

Maharashtra Election । ईव्हीएममध्ये बिघाडामुळे मतदान प्रक्रियेत अडचणी; महाराष्ट्रात मतदान खोळंबले

ही इनोवा कार मंत्री पार्क सोसायटीच्या समोर उभी होती आणि त्यात एक मोठी रक्कम ठेवली होती. कार जप्त केल्यानंतर पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे, मात्र यावर कुठल्या नेत्याचे नाव आले आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारमधील पैशांचा स्त्रोत काय आहे आणि निवडणुकीपूर्वी इतकी मोठी रक्कम का ठेवण्यात आली, याचे कारण पोलिस शोधत आहेत. शिंदे गटाच्या स्टीकरमुळे, या प्रकरणात राजकीय वर्तुळात तणाव निर्माण झाला आहे.

Vinod Tawde । मोठी बातमी! ज्या हॉटेलमध्ये विनोद तावडेंना पकडलं त्याच हॉटेलमध्ये ७ महिला सापडल्या; राजकारणात खळबळ

दरम्यान, याआधी भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप करण्यात आला होता. बहुजन विकास आघाडीने तावडे यांच्यावर 5 कोटी रुपये वाटल्याचा गंभीर आरोप केला होता. मात्र, तावडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून निवडणूक आयोगाने या प्रकरणाची चौकशी करावी, असे त्यांनी सांगितले. याबाबत सीसीटीव्ही तपासणी करुन सत्य समोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Vinod Tawde | विनोद तावडेंवर पैसे वाट्ल्याचा आरोप; विरारमध्ये नेमकं काय घडलं?

तसेच, शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या कंपनीच्या अधिकाऱ्याला कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात नोटेच्या वाटप करत पकडले गेले. यावेळी मोहितेकडे एक यादी देखील सापडली होती, ज्यामध्ये पैसे वाटलेल्या लोकांची माहिती होती. या सर्व घटनांमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे आणि निवडणूक आयोग यावर सखोल तपास करत आहे.

Baramati News | बारामतीत पोलिसांची शोध मोहीम; युगेंद्र पवार यांच्या शोरुममध्ये तपासणी, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खळबळ

Spread the love