Maharashtra Election । ईव्हीएममध्ये बिघाडामुळे मतदान प्रक्रियेत अडचणी; महाराष्ट्रात मतदान खोळंबले

Maharashtra Election

Maharashtra Election । महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये मतदान प्रक्रिया आज सुरळीत सुरू असताना, काही मतदारसंघात तांत्रिक बिघाडामुळे मतदानावर मोठा परिणाम झाला आहे. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरूवात झाली असताना, काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ उडाला आहे.

Baramati News | बारामतीत पोलिसांची शोध मोहीम; युगेंद्र पवार यांच्या शोरुममध्ये तपासणी, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खळबळ

मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात बूथ क्रमांक 292 येथील ईव्हीएम मशीन बंद पडल्याचे समोर आले आहे. हे मशीन इनव्हॅलिड दाखवत असल्यामुळे अनेक मतदार मतदानासाठी रांगेत उभे असून, मतदान प्रक्रिया सुरू होण्यासाठी विलंब होतोय. यामुळे मतदारांचा मोठा खोळंबा झाला आहे. मालेगावमध्ये मतदान केंद्रावर तासभरांपेक्षा अधिक वेळ थांबावे लागले.

Politics News । मतदानाच्या एक दिवस आधी उद्धव ठाकरे गटाला शिंदे गटाकडून मोठा धक्का!

तसाच प्रकार नाशिकच्या पंचवटी भागातील सोनुबाई केला मतदान केंद्रावर देखील दिसून आला. येथील 189 क्रमांकाच्या बूथवर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मतदान प्रक्रियेला 20 मिनिटांचा उशीर झाला. हे बिघाड लवकर दुरुस्त झाल्यानंतर मतदान सुरू झाले.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन सुरू होत नसल्याने मतदान प्रक्रिया 15 ते 20 मिनिटे विलंबली. मतदान केंद्रावर अधिकाऱ्यांनी तांत्रिक मदतीचा वापर करून मशीन सुरू केल्यानंतर मतदानाची प्रक्रिया सुरू झाली.

Sharad Pawar l रोहित पवारांना देणार मोठी जबाबदारी; शरद पवारांनी भरसभेत जाहीर केलं

महाराष्ट्रात एकाच टप्प्यात 288 विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान होत आहे, ज्यात 4,136 उमेदवार रिंगणात आहेत. या मतदानासाठी एकूण 158 पक्ष आणि 2,086 अपक्ष उमेदवार भाग घेत आहेत. यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या दरम्यान तीव्र लढत पाहायला मिळत आहे. 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल आणि त्या वेळी राज्यातील पुढील सरकाराचे चित्र स्पष्ट होईल.

Nashik News । सर्वात मोठी बातमी! नामांकित हॉटेलमध्ये निवडणूक आयोगाची मोठी धडक कारवाई, 5 कोटी रुपये जप्त, राजकीय नेत्याची गाडीही जप्त

Spread the love