Vinod Tawde | महाराष्ट्रातील निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी दावा केला आहे की, तावडे विरारमधील विवांत हॉटेलमध्ये 5 कोटी रुपये घेऊन आले होते आणि त्यांना पैसे वाटताना पकडले गेले. त्यानंतर, बविआच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलवर धाव घेतली आणि भाजप कार्यकर्त्यांशी तुफान राडा झाला. हॉटेलबाहेर मोठ्या संख्येने बविआचे कार्यकर्ते जमा झाले असून पोलीसही तिथे दाखल झाले आहेत.
हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले की, विनोद तावडे आणि भाजपचे उमेदवार राजन नाईक हे हॉटेलमध्ये बैठक घेत होते, तेव्हा बविआचे कार्यकर्त्यांना ह्याची माहिती मिळाली. हॉटेलमध्ये घुसल्यानंतर तावडे यांना पैसे वाटताना पकडले गेले. तसेच, ठाकूर यांनी दावा केला की, त्यांच्याकडे एक डायरी आहे ज्यात कोणत्या क्षेत्रात किती पैसे वाटले जाणार आहेत याची तपशीलवार माहिती आहे. हॉटेलमध्ये आणलेले पैसे आणि त्यांचे वितरण कसे झाले याची माहिती त्यात आहे, असं त्यांनी सांगितलं.
Politics News । मतदानाच्या एक दिवस आधी उद्धव ठाकरे गटाला शिंदे गटाकडून मोठा धक्का!
आरोपानंतर तावडे यांनी बविआचे कार्यकर्त्यांना 25 वेळा फोन करून “मला माफ करा, मला जाऊ द्या” अशी विनवणी केली, असा दावा ठाकूर यांनी केला. हॉटेलबाहेर ठाकूर, त्यांच्या पुत्रांसह हजारो कार्यकर्ते ठाण मांडून बसले आहेत आणि तावडे यांच्यावर कारवाईची मागणी करत आहेत. तावडे हे अजूनही हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर एका रूममध्ये बसले असून, त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत ते सोडले जाणार नाही, असा इशारा ठाकूर यांनी दिला आहे.
Sharad Pawar l रोहित पवारांना देणार मोठी जबाबदारी; शरद पवारांनी भरसभेत जाहीर केलं