Ajit Pawar । दौंड मोळीपूजन करण्यास अजित पवारांना मराठा क्रांती मोर्चाचा कडाडून विरोध, सुनेत्रा पवारांनी घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar

Ajit Pawar । मागील काही दिवसांपासून मराठा समाज आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करत आहे. त्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा मराठा समाजाने घेतला आहे. बारामतीपाठोपाठ आता दौंड शुगरचे मोळीपूजन करण्यास उपमुख्यमंत्री अजित पवारांना मराठा क्रांती मोर्चाने विरोध केला आहे. (Latest Marathi News)

Arvind Kejriwal । मोठी बातमी! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज अटक होणार?

मोळीपूजन अजित पवारांच्या हस्ते करू नका अशा आशयाचे पत्र मराठा क्रांती मोर्चाकडून पोलीस प्रशासनाला देण्यात आले होते. मोळीपूजन करण्यास अजित पवार आले तर त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला होता. अशातच आता अजित पवार या मोळीपूजनाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती कारखान्याकडून दिली आहे.

Maratha Reservation । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, एकनाथ शिंदेनी फेटाळली मनोज जरांगे पाटील यांची मागणी

दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याच्या मोळीपूजनाला अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या हस्ते पार पडणार आहे. दरम्यान, बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना हा कारखाना सहकारी तत्त्वावर चालत असून दौंडमध्ये अजित पवारांच्या खाजगी मालकीचा कारखाना आहे. परंतु आता मराठा क्रांती मोर्चाने या कारखान्यावर अजित पवारांना येण्यास कडाडून विरोध केला आहे.

Hasan Mushrif । सर्वात मोठी बातमी! मराठा आंदोलकांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची केली तोडफोड

Spread the love