Maratha Reservation । मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. सरकारला अजूनही यावर मार्ग काढता आला नाही. मागील काही दिवसांपासून मराठा समाज आरक्षणासाठी (Reservation) आंदोलन करत आहे. त्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा मराठा समाजाने घेतला आहे. (Latest Marathi News)
शांततेत सुरु असणाऱ्या आंदोलनाने (Reservation Protest) आता हिंसक वळण घेतले आहे. मराठवाड्यातील आंदोलनाने उग्र रूप धारण केले आहे. याच पार्श्वभूमीवर बीड आणि धारशीवमध्ये संचारबंदी लागू करावी लागली. शिवाय मराठवाड्यात लोकप्रतिनिधींच्या घरावर हल्ले झाल्याची घटना घडली. अशातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Arvind Kejriwal । मोठी बातमी! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज अटक होणार?
लोकप्रतिनिधींच्या घरावर झालेल्या हल्ल्यावेळी संतप्त जमावाकडून महिला अन् लहान मुलांना टार्गेट करण्यात आली होती, असा दावा बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी माध्यमांशी संवाद साधताना केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हल्ला करणारे 17 ते 22 वयोगटातील तरुण होते. या प्रकरणी आरोपींवर कारवाई केली जाईल, असेही ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.