Maratha Reservation । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, एकनाथ शिंदेनी फेटाळली मनोज जरांगे पाटील यांची मागणी

Maratha Reservation

Maratha Reservation । मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्याचे वातावरण चांगलेच पेटले आहे. याला कारण आहे ते म्हणजे मराठा आंदोलन. मराठा समाजाला आरक्षण (Reservation) मिळावे या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरु केले आहे. याच संदर्भात आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावरून आता आणखी वातावरण तापू शकते. (Latest Marathi News)

Hasan Mushrif । सर्वात मोठी बातमी! मराठा आंदोलकांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची केली तोडफोड

“कुणबी म्हणून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यावर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाले असून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला आणखी काही दिवसांचा वेळ द्यावा, अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

Airbags Can Kill You । कारची एअरबॅग घेईल तुमचा जीव! चुकूनही ‘या’ चुका करू नका

मराठा समाजाने थोडा संयम बाळगावा. राज्यात कुणीही कायदा हाती घेऊ नये, राज्यातील शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी. तसेच आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य करून उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन बैठकीत केले आहे. त्यामुळे आता सरकारच्या या निर्णयानंतर मनोज जरांगे पाटील कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ajit Pawar । मोठी बातमी! अजित पवारांना  डेंग्यूची लागण, 101 ताप; प्रकृती ढासळली

Spread the love