Hasan Mushrif । सर्वात मोठी बातमी! मराठा आंदोलकांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची केली तोडफोड

Hasan Mushrif

Hasan Mushrif । मराठा आरक्षणामुळे (Maratha Reservation) आता राज्यभर चांगलेच वातावरण तापल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. मराठा बांधव आता आक्रमक झाल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ, सरकारी गाड्यांची तोडफोड त्याचबरोबर मंत्र्यांना अडवण्याचे प्रकार घडत आहेत. मराठा आरक्षणाची ढग आता थेट मंत्रालयापर्यंत पोहोचली आहे. मंत्रालय परिसरामध्ये असणाऱ्या आमदार निवास परिसरात गाड्यांची तोडफोड करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Airbags Can Kill You । कारची एअरबॅग घेईल तुमचा जीव! चुकूनही ‘या’ चुका करू नका

माहितीनुसार, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. मराठा आंदोलकांनी ही तोडफोड केल्याची माहिती मिळत आहे. तीन तरुणांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. तोडफोड केल्यानंतर या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी केली जात आहे.

Ajit Pawar । मोठी बातमी! अजित पवारांना  डेंग्यूची लागण, 101 ताप; प्रकृती ढासळली

दरम्यान, मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड झाल्याची माहिती मिळताच कोल्हापूर पोलीस सतर्क झाले आहेत. मुश्रीफ यांच्या कागल मधील निवासस्थानी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे.

Ajit Pawar । धक्कादायक! अजितदादा गटाच्या आमदाराचा मराठा बांधवानी पेटवला बंगला

Spread the love