Manoj Jarange Patil । सध्या राज्यभर मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालन्यातील मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. त्यांनी जवळपास 17 दिवस उपोषण केले. त्यामुळे सध्या आता त्यांची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांचा लढा अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. नुकतच काल मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सोडल आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पीत त्यांनी उपोषण सोडलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यावर एका गावात चक्क बैलाच्या अंगावर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिमा रेखाटण्यात आली आहे आणि या बैलाची संपूर्ण गावांमधून मिरवणूक देखील काढण्यात आली आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी उपोषण करून सरकारी यंत्रणा हलवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची क्रेज मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळत आहे.
धाराशिव मधील दहिफळ या गावांमध्ये बैलाच्या अंगावर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिमा रेखाटण्यात आली आहे. विविध रंगांच्या साह्याने बैलाच्या अंगावर जरांगे पाटील यांचे चित्र काढण्यात आले आहे. गावातून वाजत गाजत या बैलाची मिरवणूक करण्यात आली आणि या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Breaking News । मुंबई विमानतळावर विमान क्रॅश, लँडिंग करताना विमानाचे झाले दोन तुकडे