Supriya Sule । वडील म्हणून शरद पवार कसे आहेत? सुप्रिया सुळे यांनी सांगितली आठवण

How is Sharad Pawar as a father? Reminisced by Supriya Sule

Supriya Sule । मुंबई : प्रसिद्ध गायक अवधुक गुप्ते यांच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. येत्या रविवारी हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे. या कार्यक्रमाचा प्रोमोशनल व्हिडिओ सध्या समोर आला आहे. त्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या स्वभावाचा उलगडा केला. (Latest Marathi News)

Manoj Jarange Patil । शेतकऱ्याने चक्क बैलाच्या अंगावर रेखाटले मनोज जरांगे पाटलांचे चित्र; गावभर काढली मिरवणूक

“शरद पवार फार कमी बोलतात,खूप मार्गदर्शन करत नाहीत. ज्यावेळी मी पहिल्यांदा खासदार झाले त्यावेळी त्यांनी मला एक सल्ला दिलेला तो आजही मला आठवतो. आज तू गेट नंबर एकने लोकसभेच्या पायऱ्या चढणार आहेस. मतदारांमुळे तुला ही संधी मिळाली आहे. दरवेळी पायऱ्या चढत असताना हे विसरु नकोस. ज्या दिवशी तू हे विसरशील त्यावेळी तुला ह्या पायऱ्या चढता येणार नाहीत,” अशी आठवण सुप्रिया सुळे यांनी सांगितली.

Maharastra Politics । सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कुणाचा? अजित पवार की शरद पवार? समोर आली मोठी अपडेट

पुढे सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीतील बंडखोरीवरही भाष्य केले. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) फुटला नाही. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत. अजित पवार हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार आहेत. त्यांनी पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात काही निर्णय घेतले असल्याने त्यांना पक्षाने नोटीस बजावली आहे,” असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

Accident News । बैलाला अंघोळ घालण्यासाठी नदीपात्रात गेलेल्या १५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू; संपूर्ण गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

Spread the love