Breaking News । मुंबई विमानतळावर विमान क्रॅश, लँडिंग करताना विमानाचे झाले दोन तुकडे

Aircraft crashes at Mumbai airport

Breaking News । सध्या अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई विमानतळावर हवामानाच्या बदलामुळे विमान क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातग्रस्त विमान हे खाजगी विमान आहे. ही दुर्घटना घडताच मुंबई विमानतळावरील विमानांची टेकऑफ आणि लँडिंग बंद करण्यात आली आहे. अपघात झालेल्या विमानामध्ये एकूण सहा जण होते. त्याचबरोबर दोन क्रूमेंबर देखील या विमानामध्ये होते. या अपघातात तीन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Elvish Yadav । एल्विश यादवने दुबईमध्ये खरेदी केले तब्बल ‘इतक्या’ कोटी रुपयांचे घर, किंमत ऐकून बसेल धक्का

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आज संध्याकाळी ५ वाजेच्या दरम्यान घडली आहे. विशाखापट्टनमच्या विझाग येथून निघालेलं विमान मुंबई विमानतळावर लँडिंगसाठी खाली उतरत होतं यावेळी मुसळधार पाऊस पडत होता. मात्र जमिनीच्या अवघ्या काही अंतरावर असतानाच विमान क्रॅश झाले.

Manoj jarange patil | आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ज्यूस पित मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण घेतले मागे

हे विमान क्रॅश झाल्यानंतर तातडीने पोलीस, एयरपोर्ट अथॉरिटी टीम आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने क्रूमेंबर्स आणि इतर नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर अपघातग्रस्त विमानातून सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. माहितीनुसार या अपघातामध्ये जवळपास तीन प्रवासी जखमी झाले आहेत. या घडलेल्या घटनेमुळे विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

Maharashtra Politics । शिंदे गट की ठाकरे गट कोणाचे आमदार अपात्र ठरणार? आज होणार सुनावणी

Spread the love