Accident News । बैलाला अंघोळ घालण्यासाठी नदीपात्रात गेलेल्या १५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू; संपूर्ण गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

Akola Accident News

आज राज्यभर बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. बैलपोळा हा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा सण असतो. या दिवशी शेतकरी त्यांच्या बैलांना अंघोळ घालतात आणि छान पद्धतीने सजवतात. मात्र या सणाला अकोल्यामध्ये गालबोट लागले आहे. अकोल्यामध्ये बैलपोळ्याच्या दिवशी बैल धुण्यासाठी गेलेल्या एका पंधरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. (Akola News)

Breaking News । मुंबई विमानतळावर विमान क्रॅश, लँडिंग करताना विमानाचे झाले दोन तुकडे

नेमकं काय झालं?

अकोला जिल्ह्यातील दहीहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या करोडी या ठिकाणी एका शेतकऱ्याचा मुलगा बैल धुण्यासाठी नदीपात्रात गेला होता. मात्र यावेळी होत्याचं नव्हतं झालं त्या मुलाचा अचानक दगडावरून पाय घसरला आणि त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. समर्थ गणेश गेड असे या मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

Elvish Yadav । एल्विश यादवने दुबईमध्ये खरेदी केले तब्बल ‘इतक्या’ कोटी रुपयांचे घर, किंमत ऐकून बसेल धक्का

नेमकी सणाच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह अकोट येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला असून सध्या या प्रकरणाबाबत अधिकचा तपास पोलीस यंत्रणा करत आहेत. मात्र या घटनेमुळे तेथील परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Manoj jarange patil | आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ज्यूस पित मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण घेतले मागे

Spread the love