Manoj Jarange Patil । बिग ब्रेकिंग! जरांगे पाटलांची बिघडली तब्येत, तातडीने रुग्णालयात केले दाखल

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil । राज्यात सध्या निवडणुकीची (Loksabha election) धामधूम सुरु आहे. दिवसेंदिवस निवडणुकांमुळे राज्याचे राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. राजकीय नेते भर उन्हात प्रचारसभा घेत आहे. आगामी निवडणुकीत राज्यात महायुतीचे सरकार येणार की महाविकास आघाडीचे सरकार येणार? हे येत्या काळात स्पष्ट होईल. अशातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. (Latest marathi news)

Crime news । बारामती हादरली! लाईटचे बिल जास्त आल्याने महावितरण कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला, महिलेचा जागीच मृत्यू

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील हे विविध राज्यांचा दौरा करताना दिसत आहेत. मनोज जरांगे पाटील सगे-सोयरेच्या मुद्द्यावर ठाम असून ते राज्यात ठिकठिकाणी जाऊन मराठा समाजासमोर आपली भूमिका मांडत आहेत. (Maratha Reservation Strike) नुकतेच ते बीडच्या दौऱ्यावर होते. पण या दरम्यान त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे.

BJP । भाजपला सर्वात मोठा धक्का! 25 वर्षांपासून सोबत असलेल्या बड्या नेत्याचा साथ सोडत शरद गटात प्रवेश

सध्या राज्यात उन्हाचा चटका बसत आहेत. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. राजकीय नेत्यांनाही उन्हाचा फटका बसत आहे. अशातच आता मनोज जरांगे पाटील यांना उन्हाचा त्रास झाला. त्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल केलं आहे. जरांगे पाटील लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना त्यांच्या समर्थकांकडून आणि मराठा समाजाकडून करण्यात येत आहे.

Nitin Gadkari । ब्रेकिंग! नितीन गडकरी यांना भाषण करताना अचानक भोवळ

Spread the love