Ajit Pawar । शरद पवारांबाबत अजित पवार यांनी केला सर्वात मोठा गौप्यस्फोट

Ajit Pawar

Ajit Pawar । राज्यात सध्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. दिवसेंदिवस निवडणुकांमुळे राज्याचे राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. राजकीय नेते भर उन्हात प्रचारसभा घेत आहे. आगामी निवडणुकीत राज्यात महायुतीचे सरकार येणार की महाविकास आघाडीचे सरकार येणार? हे येत्या काळात स्पष्ट होईल. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. (Ajit Pawar vs Sharad Pawar)

Manoj Jarange Patil । बिग ब्रेकिंग! जरांगे पाटलांची बिघडली तब्येत, तातडीने रुग्णालयात केले दाखल

अजित पवारांनी नुकतीच एका टीव्ही चॅनेलला विशेष मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले की, “पवार कुटुंब पहिल्यांदाच दोन गटात विभागलं नाही. आमचे थोरले काका असतानाही असंच झालं होतं. आमचं संपूर्ण कुटुंब शेतकरी कामगार पक्षाचं होतं. हे नवीन बारामतीकरांना माहीत नाही. पण जुन्या बारामतीकरांना माहीत आहे. त्यावेळी एकटे पवार साहेब (Sharad Pawar) काँग्रेससाठी काम करत होते,” असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. (Latest marathi news)

Crime news । बारामती हादरली! लाईटचे बिल जास्त आल्याने महावितरण कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला, महिलेचा जागीच मृत्यू

“आमच्या कुटुंबाला हे नवीन नाही. तुम्ही म्हणता कुटुंब एकटं पडलं, पण कुटुंबातीलच ज्यांचा राजकारणाचा संबंध नाही. ते बाजूला आहेत. आम्हाला दोघेही सारखे आहेत, असं ते म्हणत आहेत. आमच्या अनेक बहिणी म्हणतात आम्हाला दोघे सारखे आहेत. कोणी कोणाचा प्रचार करावा हा ज्याचा त्याचा अधिकार आहे,” असेही अजित पवार म्हणाले आहेत.

BJP । भाजपला सर्वात मोठा धक्का! 25 वर्षांपासून सोबत असलेल्या बड्या नेत्याचा साथ सोडत शरद गटात प्रवेश

Spread the love