Manoj Jarange Patil । ‘या’ तारखेपासून पुन्हा उपोषणाला बसणार.. जरांगे पाटील यांनी केली सर्वात मोठी घोषणा

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil । सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकांची धामधूम पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा इशारा दिला आहे. मागच्या काही महिन्यांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. दरम्यान आता जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा एक मोठा इशारा दिला आहे.

Sujay Vikhe Patil । अहमदनगरच्या राजकारणात मोठी खळबळ, सुजय विखे पाटलांबद्दल तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

6 जून पर्यंत ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर मराठा समाज विधानसभेची तयार करणार असल्याचा इशारा थेट मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या जयंतीनिमित्त मनोज जरांगे पाटील यांनी सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर 6 जून पर्यंत जर ओबीसी मधून आरक्षण दिलं नाही तर मराठा समाज विधानसभेची तयार तयारी करणार त्याचबरोबर 5 जून पासून पुन्हा उपोषणाला सुरुवात करणार अशी घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे.

Salman Khan । धक्कादायक बातमी! सलमान खानच्या घराबाहेर पहाटे गोळीबार

त्याचबरोबर, यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, “मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. सात महिन्यांआधीचे गुन्हे काढले जात आहेत. मात्र गोळ्या झाडणार्‍या पोलीस अधिकाऱ्याला बढती दिली. त्यामुळे गृहमंत्री म्हणून शाबासकी देण्यासारखी कामगिरी फडणवीस यांनी केली आहे” अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे

Sushma Andhare । ठाकरे गटाला निवडणुकीपूर्वी मोठा धक्का, बड्या नेत्यावर राज्य निवडणूक आयोगात तक्रार दाखल

Spread the love